
गूगलने लोकांची प्रतिक्षा संपवली आहे आणि Made By Google Event मध्ये लवकरच त्यांच्या नवीन मोबाईल मालिकेतला Pixel 8 आणि Pixel 8 Pro लॉंच करणार आहेत.Google ४ ऑक्टोबर रोजी आपल्या या नवीन मालिकेतले फोन आणि त्या सोबत बहुप्रतीक्षित पिक्सेल watch -2 ही लॉंच करणार आहे. बहूप्रतीक्षित असलेला गूगलचा फोन लवकरच भारतीय बाजार पेठेत ही दाखल होईल.
गूगलने त्यांचा वार्षिक Made by Google इव्हेंट ४ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्क शहरात ठीक सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम यूट्यूब (Youtube) आणि त्यांच्या गुगल स्टोर वेबसाइट वरती पाहायला मिळेल.या इव्हेंटचा मुख्य लक्ष्य केन्द्रित असतील ते गुगलचे २०२३ वर्षातील नवीन प्रमुख फोन असतील,ते म्हणजे pixel 8 आणि pixel 8 pro. गूगलच्या विपणन(Marketing) धोरणांच्या नुसार गुगलणेच त्याच्या ह्या नवीन प्रमुख फोनचे डिजाइन आणि कॅमेरा लीक केला होता. आपण बहुप्रतीक्षित गुगल इव्हेंटची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. गुगल त्याच्या प्रत्येक नवीन इव्हेंट मध्ये नवीन फोनच्या आनावरना सोबत नवीन तंत्रज्ञांनाच्या सीमा ओलांडत असते. नवीन फोन नवीन तंत्रज्ञांनासोबत काय काय करू शकतो हे सांगितलं जात.आम्ही तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये google pixel 8 आणि google pixel 8 pro कडून काय आपेक्षा ठेऊ शकतो ह्याची माहिती देयू.

Pixel 8

Pixel 8 pro
गूगलने आपल्या नवीन फोनबद्दलची बहुतेक माहिती ही लपवून ठेवलेली आहे. तरी ही काही वेबसाइटच्या लिक बातमीनुसार गूगल आपल्या फोन मध्ये नवीन Tensor G3 चिप जो गूगलने कस्टम मेड प्रॉसेसर तयार केला आहे आणि तो Pixel 8 आणि Pixel 8 Pro या दोन्ही फोन मध्ये दिसणार आहे. बाहेर पडलेल्या माहिती नुसार हा प्रॉसेसर Tensor G2 पेक्षा थोडा प्रगत असेल.
गूगल ने आपल्या नवीन फोनसाठी असा दावा केला आहे की हे दोन्ही फोन मशीन लर्निंग आणि आर्टिफिशल इंटेलिजेंस समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त असतील. गूगल पिक्सल 8 प्रो मध्ये त्यांनी QHD+6.7 इंचचा डिसप्ले दिला आहे,जो 120Hz रीफ्रेश रेट वरती काम करेल. 5,000mAh बॅटरी सोबत येत आहे. त्यासोबत वायरलेस चार्जिंग आणि वॉटर रेसिस्टंस असेल.
गुगल pixel 8 आणि pixel 8 pro हे नवीन गुगलचे फोन आहे जे त्यांच्या नवीन Tensor G3 प्रॉसेसर वर काम करणार आहेत . ह्या दोन्ही फोन मध्ये काही समान बाबी आहेत काही भिन्न बाबी आहेत. त्यांच्या पसरलेल्या आफवा नुसार काही फरक आम्ही येथे देत आहोत.
डिसप्ले -:
गुगल पिक्सेल 8 मध्ये 6.17 इंचचा OLED स्क्रीन डिसप्ले दिलेला असेल आणि त्याचा रेजोल्यूशन 2400 x 1080 pixels असेल.तसेच पिक्सेल 8 pro मध्ये त्यांनी QHD+6.7 इंचचा OLED डिसप्ले आणि त्याचा रेजोल्यूशन 3120 x 1440 pixels दिलेला असेल. दोन्ही डिसप्ले हे 120Hz रीफ्रेश रेट वरती काम करतील,आणि HDR10+ सपोर्ट करेल.
कॅमेरा -:
गूगल पिक्सेल 8 प्रो मध्ये तीन कॅमेरा असलेला सेटअप दिला आहे आणि पिक्सेल 8 मध्ये दोन कॅमेरा सेटअप दिलेला आहे. पिक्सेल 8 प्रो मध्ये त्यांनी तीन कॅमेरा सेटअप मध्ये 64 मेगापिक्सेल मेन कॅमेरा असेल, 48 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा असेल,आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा सेटअप असेल. तोच पिक्सेल 8 मध्ये 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा असेल तसेच आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा सेटअप असेल. 10 मेगापिक्सेल हा दोन्ही फोनमध्ये समोरचा कॅमेरा असेल.
स्टोरेज -:
पिक्सेल 8 मध्ये 12gb आणि 128 gb असू शकेल आणि पिक्सेल 8 प्रो मध्ये 12gb आणि 128 gb ,256 gb हे दोन प्रकार असतील. ह्या बद्दल आपल्याला लवकरच सूचित करू. ह्या दोन्ही फोनमध्ये त्यांनी मायक्रोएसडी साठी कोणताही पर्याय दिलेला नाही.
बॅटरी -:
बॅटरी हा सर्वात महत्वाचा भाग आहेच,तर गूगलने पिक्सेल 8 प्रो साठी 4950 mAh आणि पिक्सेल 8 साठी 4485 mAh बॅटरी बॅकअप दिलेला असेल. दोन्ही फोन type -c जलद चार्जिंगला सपोर्ट करतील.
हे दोन्ही फोन आपल्याला भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळतील. त्याची प्रचिती फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळावर पहायला मिळाली. तिथे ही तुम्हाला 5 ऑक्टोबर पासून ह्या फोनची प्री-ऑर्डर करता येईल.
