गुगलचा नवीन फोन बाजारात दाखल! Pixel 8 आणि Pixel 8 प्रो नवीन वैशिष्ट्यांसह सादर केला आहे. भारतातील प्री-ऑर्डर कींमत आणि त्याचे तपशील.

गूगलने त्यांचा बहूप्रतिक्षित नवीन फोन Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro लॉंच केला आहे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या गूगल इवेंट मध्ये गूगल पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो हे लॉंच केले. त्यासोबत पिक्सेल वॉच-2 आणि पिक्सेल buds प्रो ही लॉंच केला आहे. गूगल ने पिक्सेल फोन, वॉच -2 आणि पिक्सेल Buds प्रो भारतात देखील एकाचवेळी लॉंच केले आहेत.
Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro प्री-ऑर्डर तपशील
गूगल शोध यंत्रनेतील एक प्रबळ आणि प्रमुख अशी कंपनी आहे, गूगल ने पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो भारतात लॉंच केले आहेत आणि भारतातील ए-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर प्री- ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे.फ्लिपकार्ट वर प्री-ऑर्डर ही ५ ऑक्टोबर पासून झाली आहे. पिक्सेल ८ ची कींमत ७५,९९९ ठेवली आहे आणि पिक्सेल ८ प्रो ची कींमत १,०६,९९९ ही ठेवण्यात आली आहे. तुम्ही फ्लिपकार्ट वरुण हे दोन्ही मोबाइल फोन प्री-ऑर्डर करू शकता.या सोबत फ्लिपकार्ट मध्ये या फोनस्वर एक्सचेंज वर आणि बँकांच्या सवलतीवर मोठ्ठी सूट मिळू शकते,यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट वर यासंबधि ऑफर पाहू शकता.जर तुम्ही प्री-ऑर्डर केलात तर तुम्हाला त्याच्या सोबत पिक्सेल वॉच -२ हे १९,९९९ रुपयात भेटेल,किंवा त्याच्या सोबत गूगल पिक्सेल बड्स प्रो घेऊ शकता जे तुम्हाला ८,९९९ किमतीत पडेल.
गूगल पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो चे तपशील
गूगल ने Pixel 8 आणिPixel 8 Pro साठी त्यांचा कस्टम मेड Tensor G3 प्रॉसेसर वापरलेला आहे

गूगल पिक्सेल 8-:
पिक्सेल 8 हा तीन रंगांमध्ये पाहायला मिळेल. Hazel Obsidian,Rose



गूगल ने Pixel 8 साठी ६.२ इंचचा FULL HD + OLED डिसप्ले दिला आहे जो HDR सपोर्ट करत. पिक्सेल ८ मध्ये तुम्हाला गूगलचा नवीन Actua डिसप्ले पाहायला मिळेल जो ६०-१२०Hz काम करेल.ह्या फोनच्या डिसप्लेला corning gorilla glass Victus सपोर्ट असेल मागे आणि पुढे .ह्या फोनचा पीक ब्राइटनेस असेल २००० नीटसचा.खूप चांगला आणि तगडा डिसप्ले दिलेला आहे गूगलने. पिक्सेल ८ साठी बॅटरी ही ४४८५ mAh दिली आहे,जसे गूगल च्या दाव्यानुसार २४ तासाच्यावर तुम्हाला सपोर्ट भेटेल.फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो,पण ह्यासाठी तुम्हाला गूगलचा फास्ट चार्जर ३० W USB -C जो USB PD ३.० सपोर्ट करतो तो तुम्हाला वेगळा विकत घ्यावा लागेल. मेमरी आणि स्टोरेजचा बघता भारतात पहिल्यांदा गूगलने पिक्सेल ८ हा दोन स्टोरेज प्रकारात बाजारात आणला आहे. ८ जीबी ram जी LPDDR5X असेल आणि स्टोरेज असेल 128 gb /256 gb असेल.ह्या मध्ये तुम्हाला Titan M2 सेक्युर्टी चीप दिली आहे. ह्यामध्ये तुम्हाला face unlock ,under-display fingerprint sensor दिला आहे. कॅमेराच्या बाबतीत गूगल कधी मागे पडत नाही ह्यावेळी ही गूगलने पिक्सेल 8 मध्ये मागच्या बाजूला दोन कॅमेरे दिले आहेत जे 50 MP जो wide कॅमेरा जो f/1.68 अपर्चरचा असेल, जो Super Rex Zoom 8X ला सपोर्ट करतो. दूसरा 12 MP Ultrawide Camera जो Autofocus सोबत f/2.2 अपर्चरचा असेल. समोरचा(शेल्फी🤳) कॅमेरा हा 10.5 MP जो f/2.2 अपर्चरचा असेल. तुम्ही समोरच्या आणि मागच्या कॅमेरा मधून 4K विडियो काढू शकता.ह्या मध्ये तुम्हाला सगळे सेन्सर बघायला मिळतील. सिम कार्डच म्हणाल तर ह्या मध्ये ड्युल सिम भेटेल पण एक नॅनो सिम असेल आणि दूसरा ई- सिम तुम्हाला वापरावं लागेल. वायफाय कनेक्टिविटी साठी Wi-Fi 6 चा सपोर्ट दिला आहे, ब्ल्युटूथ 5.3,NFC. पिक्सेल 8 मध्ये 5G – 21 बॅंड ना सपोर्ट करतो.
गूगल पिक्सेल 8 प्रो -:
पिक्सेल 8 प्रो हा दोन रंगांमध्ये पाहायला मिळेल. Bay, Obsidian


गूगल ने Pixel 8 Pro साठी ६.७ इंचचा LTPO OLED FULL HD + AMOLED डिसप्ले दिला आहे जो HDR सपोर्ट करत. पिक्सेल ८ प्रो मध्ये तुम्हाला गूगलचा नवीन Super Actua डिसप्ले पाहायला मिळेल जो १ -१२० Hz काम करेल.ह्या फोनच्या डिसप्लेला Corning Gorilla Glass Victus 2 चा सपोर्ट असेल मागे आणि पुढे .ह्या फोनचा पीक ब्राइटनेस असेल २४०० नीटसचा.खूप चांगला आणि तगडा डिसप्ले दिलेला आहे गूगलने. पिक्सेल ८ प्रो साठी बॅटरी ही ५०५० mAh दिली आहे,जसे गूगल च्या दाव्यानुसार २४ तासाच्यावर तुम्हाला सपोर्ट भेटेल.फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो,पण ह्यासाठी तुम्हाला गूगलचा फास्ट चार्जर ३० W USB -C जो USB PD ३.० ला सपोर्ट करतो तो तुम्हाला वेगळा विकत घ्यावा लागेल. मेमरी आणि स्टोरेजचा बघता गूगलने पिक्सेल ८ प्रो हा एका स्टोरेज प्रकारात बाजारात आणला आहे. 12 GB Ram जी LPDDR5X असेल आणि स्टोरेज असेल 128 GB असेल. ह्या मध्ये तुम्हाला Titan M2 सेक्युर्टी चीप दिली आहे. ह्यामध्ये तुम्हाला face unlock ,under-display fingerprint sensor दिला आहे. कॅमेराच्या बाबतीत गूगल कधी मागे पडत नाही गूगलने पिक्सेल 8 प्रो मध्ये मागच्या बाजूला तीन कॅमेरे दिले आहेत जे 50 MP wide कॅमेरा जो f/1.68 अपर्चरचा असेल. दूसरा 48 MP U ltrawide Camera जो Autofocus सोबत f/1.95 अपर्चरचा असेल आणि 48 MP Telephoto कॅमेरा जो f/2.8 अपर्चरचा असेल,जो 5X ऑप्टिकल झूम आणि Super Rex Zoom हा 30 X असेल. ह्यामध्ये Optical आणि Electronic इमेज stabilization दिले आहे. पहिल्यांदा फोटो प्रेमींसाठी ह्यात प्रो कंट्रोल कार्यप्रणाली दिली आहे. समोरचा(शेल्फी🤳) कॅमेरा हा 10.5 MP जो f/2.2 अपर्चरचा असेल. तुम्ही समोरच्या आणि मागच्या कॅमेरा मधून 4K विडियो काढू शकता.ह्या मध्ये तुम्हाला सगळे सेन्सर बघायला मिळतील. सिम कार्डच म्हणाल तर ह्या मध्ये ड्युल सिम भेटेल पण एक नॅनो सिम असेल आणि दूसरा ई- सिम तुम्हाला वापरावं लागेल. वायफाय कनेक्टिविटी साठी Wi-Fi 6 चा सपोर्ट दिला आहे, ब्ल्युटूथ 5.3,NFC. पिक्सेल 8 प्रो ही 21- 5G बॅंड ना सपोर्ट करतो.
गूगलने पहिल्यांदा एक मोठी गोष्ट केली आहे, ह्या दोन्ही फोनसाठी तब्बल ७ वर्षांचा OS अपडेट अँड Security अपडेट गूगल देणार आहे.



2 Comments