मराठी आणि मराठी माणूस -भाग १

कुठून आणि कशी सुरुवात करू हे समजत नाहीय, पण असो, वरच शीर्षक बघून तुम्ही म्हणत असाल हे काय नवीन सांगतोय, नाही हे नवीन नाहीच आहे ,सगळं जुनंच आहे. माहित आहे मला,पण हे जुनंच आता अजून नवीन रूप घेतंय. खरंच मराठी आणि मराठी माणूस आता राहिलाय काय मुंबई मध्ये? ….राहिला -उरला असेल तर तो कुठे? राहिलाय तो कुठे खेडो – पाडी, आणि छोट्या छोट्या गावांमध्ये राहलाय नाहीतर मुंबईच्या बाहेर.आपली मराठी भाषा आपल्या खेडो पाडी जिवंत आहे ,तिथे लोकांनी त्याला दुसरा पर्याय दिलेला नाहीय आपल्या भाषेला. महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये मराठी भाषा ही फक्त नावालाच उरलीय,मराठी भाषा म्हणजे लो क्लास आणि लो बजेट ह्या दृष्टीकोणातून बघितली जाते आपल्याकडे. हि परिस्तिथी आहे सद्यस्थितिला आपल्या महाराष्ट्रात. ही परिस्तिथी कुणी आणली?हि परिस्थिति कशी आली? ह्याचा विचार केलाय आपण कधी, नाही ! पण ही परिस्थिती आपणच आपल्या महाराष्ट्रावर आणि आपल्या मराठी माणसाने आणलीय. जर हे असंच चालू राहिल तर ती वेळ लांब नाही,की महाराष्ट्रातून मराठी भाषा हद्दपार झालेली असेल आणि मग हिंदी भाषेचा जाच सोसत बसावं लागेल आयुष्यभर महाराष्ट्राला आणि आपल्या मराठी माणसाला.

छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य उभं केलं ते काय हे असले दिवस बघण्यासाठी ,नाही ना. मग हे चाललंय काय इथे समजत नाहीय. आज त्या मराठी भाषेसाठी – मराठी माणसासाठी आज बाहेरच्या आणि आपल्याच माणसांसोबत भांडावं लागतंय. आणि एक गोष्ट अशी पण आहे ,ह्या मराठी माणसालाच हीच मराठी भाषा कमीपणाची का वाटावी ? पण का? महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्याचा उद्देश काय होता ? काय उगाचच केल का त्यांनी ?त्यावेळी परकीयांशी लढून स्वराज्य निर्माण केलं मराठी माणसाला मानाने जगायला शिकवलं. कशासाठी आणि का ? स्वराज्य हा फक्त आट्टहास नव्हता,तो एक ध्यास होता, ह्या मातीतल्या लोकांवर होणारा अन्याय, आत्याचार, गुलामगिरी सहन करणारी ही रयत ,तोंडातून ब्र न काढणारी ही रयत ,आपली ही रयत ह्या असल्या जाचातून मुक्त व्हावी आणि एक रयतच राज्य अस डौलाण ऊभ राहावं. हिंदवी स्वराज्य तर होतच पण ह्यात मराठी कधी अडगळीत पडली गेली नाही.

आज जर महाराज आणि आपले मावळे वरून पाहत असतील ना तर खरंच त्यांना इतका त्रास होत असेल, जेवढा  त्यांना  शत्रूशी लढताना पण झाला नसेल,ते म्हणत असतील हेच दिवस बघण्यासाठीच काय आपण ह्या स्वराज्याचा  खटाटोप केला होता काय?,ह्या मातीला त्यांनी परकीयांच्या जाचातून मुक्त केला आणि रयतेच राज्य उभारल .पण मला त्या दिवसांमध्ये आणि आताच्या परिस्थिमध्ये काय फरक दिसत नाहीय, कायच नाही. आताच्या घडीला परप्रांतीयांचे लोंढे जे येताएत , ते संपूर्ण महाराष्ट्र काबिज करून टाकत आहेत. काळात पण मराठी भाषेवर उर्दू आणि फारशी भाषेचा प्रभाव होता,पण स्वराज्याच्या निर्मिती नंतर महाराजां नी स्वभाषेला महत्व दिलं आणि मराठी भाषेतून राज्यकारभार सुरू केला.

अहो तुम्हाला समजत कसं नाही, ही आपली भाषांचं ही आपली ओळख आहे हे विसरतोय आपण. महाराष्ट्राची ओळख म्हणजे “छत्रपती शिवाजी महाराज“,मराठा,मराठी भाषा ही आहे. आपल्या ग्रामीण  भागातून कोणी तरुण शहराकडे आला की त्याला त्या मराठी भाषेचा हळू हळू विसर पडायला लागतो, का? कारण त्यावेळी त्याचे हिंदी भाषिक मित्र झालेले असतात,(म्हणजे मी सगळ्यांनाच दोष देतोय अशातला भाग नाही) पण माझ्या पाहण्यात आलेल्या लोकांमध्ये मी ते पाहिलंय तसं. कारण मराठी भाषा फक्त,घरातल्या लोकांपुरती होऊन जाते,मग तो मराठी असून सुद्धा मराठी माणसासोबत हिंदीतच बोलणं चालू असत ,इधर चल, जेवण हुआ क्या हे असलं मराठी भैयांचं काम चालू आहे . मग इथे मराठी भाषेने कुणाकडे दाद मागायची. माझं  म्हणणं काय आहे तर स्वराज्यासाठी आणि  महाराष्ट्रासाठी ज्यांनी खस्ता खाल्या ते फुकट च म्हणायचं का?

आज आपल्या मराठी भाषेला स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी असं धडपडावं लागतंय,ते पण स्वतःच्या च राज्यात आणि स्वत:च्या घरात,अरे पण का? मराठी भाषेने कुणाकडे दाद मागायची आणि दाद मागण्याची वेळच का यावी म्हणतो मी. राजकारण्यांना फक्त महाराजांचं नाव हे त्यांच्या घाणेरड्या राजकरणातल्या स्वार्थासाठी पाहिजे ,पण ह्या मातीसाठी,ह्या भाषेसाठी काही करायचं त्यांच्या पुसटस मनात पण येऊ नये हे खूप दुःखद आहे,आणि तस बघायला गेलं तर ह्या साठी मराठी माणूस पण तितकाच जबाबदार आहे. आज ह्या महाराष्ट्राच्या मानगुटीवर जे परराज्यातून लोंढे येऊन बसतायत आणि आपण त्याला खत पाणी घालतोय.अहो आपण आपली ओळखच पुसायला बसलोय,मला नाही पटत हे सगळं, तुम्हाला तरी पटत का?.

मला माझ्या भाषेचा ,महाराष्ट्राच्या  संस्कृतीचा खूप अभिमान आहे, आणि माझं माझ्या भाषेवर खूप प्रेम आहे . माझ्या सारखे भरपूर लोक आहेत त्यांना असं वाटत,पण त्यांचे हात कोणत्या कोणत्या ना जबाबदारी ने  बांधले आहेत,कस हाय, मराठी माणूस हा खूप असा मनातून खचून गेलेला आहे,त्याच कस झालय ,आपलं काम भलं आणि आपलं घर भलं ,बरोबरच आहे त्याच उद्या त्याच काम बंद झालं तर काय करणार,मग त्याला जे जस चाललंय तसं पुढे रेटावं लागत,पर्याय नाही,कारण मानगुटीवर बसलेले सगळे बाहेरचे कारखानदार,बिल्डर लॉबी अजून बरेच आहेत असे.मग काय करणार काय नाहीच ना,त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार येण्याचा प्रश्नच नाही, हे मुद्दे फक्त कट्ट्यावर आणि टपरीवर बोलण्यासाठी आहेत टाईमपास म्हणून.

हे असं व्हायला पाहिजे ,हे तस त्यांना करायला पाहिजे,मराठीच काय राहिलच नाही, हे मुद्दे फक्त बोलण्यासाठी आहेत,बाकी काही नाही.पण माझी जबाबदारी आहे ज्या महाराष्ट्राने एवढं मला दिलंय त्यासाठी काहीतरी करण्याची,आणि माझ्या महाराजांनी जेवढं हे निर्माण करून ठेवलंय त्या स्वराज्यासाठी काहीतरी छोटासा हातभार लावायचा एवढाच एक प्रयत्न असेल,माझा मानस आहे की ,माझ्या भाषेला आणि माझ्या मराठी माणसाला पुढे नेण्यासाठी माझ्याकडून काय करता येतील ते मी प्रयत्न करेन,आणि तुमची साथ मिळाली तर सोन्याहून पिवळं असेल …..जय महाराष्ट्र – जय शिवराय

क्रमश: ….

1 thought on “मराठी आणि मराठी माणूस -भाग १”

Leave a Comment

error: Content is protected !!
Copy link