
आताची परिस्थिती पाहता ती वेळ दूर नाही हीच बातमी वृतपत्राच्या पहिल्या पानावर आलेली असेल ” मुंबईत मराठी आपले अस्तित्व टिकवेल का ?” आणि त्यावर ती फक्त एक बातमी बनून राहिलेली असेल. मग नेते मंडळी आणि त्याचं राजकारण आणि मिडिया वाले त्याची बातमी बनवून दोन चार दिवस हेडलाईन बनवून त्याच्यावर चर्चा करत बसलेली असतील . बस्स आणि आपण लोक फक्त बघत बसायचं आणि कोण काय करतय काय ह्यावर चर्चा करत बसायच, ते बघायचं आणि केल तर त्यावर टीका टिपण्णी करत बसायचं. आणि सोशल मिडीयावर आपली मतं मांडत आणि आपल्याच माणसासोबत आपल्या ह्या विषयावर भांडत बसायच ……! आता सुद्धा तेच घडतय.
नाही नाही म्हणता मराठीच अस्तित्व ही पणाला लागल,हिंदीच भूत मानगुटीवर बसलेलंच आहे. काय तर केंद्र सरकार हिंदी ही भाषा सगळी कडे लादू पहाते आहे.मुंबईत तर मुंबईची भाषा म्हणजे हिंदी च म्हणून समजली जाते,मग काय ह्यांना आयती संधीच भेटलीय आणि मग काय मराठीच अस्तित्वच संपवून टाकायचं मुंबईमधून किंबहुना मराठी माणसाचं सुद्धा.
आज मुंबई मध्ये बघायला गेलं तर,म्हणजे जेवढं मी पाहिलंय त्या निकषावर सांगू शकतो की, मुंबई मध्ये फक्त आणि फक्त 3 ते ४ टक्के च मराठी भाषा बोलण्यात येते किंवा बोलली जाते. मराठी कुठे एक तर घरी आणि मराठी सोसायटी असेल तीथे बोलली जाते, नाहीतर बाकी सगळा हिंदीचा बोलबाला चालू आहे.भैये, मद्रासी, बांगलादेशी आणि त्या सोबत आता मराठी भैये ही जोडले गेलेत.काय अवस्था करून ठेवलीय मराठी भाषेची मुंबईमध्ये,आज आपल्यालाच आपली भाषा नको झालिये मग दुसरे तरी का ही भाषा स्वीकारतील आणि बोलतील.मराठीची एवढी का लाज वाटावी तुम्हाला!हा पडलेला एक मोठा प्रश्न आहे?
आज मराठी बोललं तर मुंबईमध्ये तर ह्यांना चालत नाही.आज सगळीकडे ह्या लोकांनी आपली बस्तान बसवली आहेत. आज ह्यांच्या दुकानात काहीतरी घेण्यासाठी मराठीत विचारलं तर हिंदी मध्ये बोला अस सरळ सरळ बोलतात.नाहीतर एक, काय समजल नाही म्हणून सांगतात म्हणजे परत आपल्याला त्याला हिंदीमध्ये सांगायला लागत.ही ह्यांची अशी डावपेच.ह्यांना मराठी नको,ह्यांना मराठी माणूस नको.मुंबईमधून ह्यांना फक्त पैसा पाहिजे बस्स.
तुम्ही कोणत्याही मुंबईतल्या गल्ली बोळात जावा कुठेच अशी जागा ठेवली नाही आहे जिथं हिंदी बोलली जात नाहीय.तेवढ कशाला आज आपली सरकारी कार्यालय आहेत,तिथं सगळी कामं ही हिंदी मध्ये होतायत,त्याचं बोलण चालूच हिंदी ने सुरु होत,जरा समोरच मराठी बोलला तर मग हे मराठीत बोलतात. मग आता विचार करा कि किती भयानक अवस्था आहे मराठीची. मराठी भाषिक च मराठीला कमीपणा आणून देत असेल तर मग ही लोक तरी का मान देतील आपल्या भाषेला. सरकारी आदेश ह्यांना सांगायचं असेल तर हे सगळं हिंदीमध्ये सांगणार,आता तुम्हीच सांगा चुकतय कुठं?.
जस आज ‘amazon’ ने त्यांच्या अँप्लिकेशन मध्ये मराठी भाषा जोडण्यासाठी त्यांनी सरळ सरळ नाही म्हणून सांगितलं,आता ह्याचा अर्थ काय म्हणजे बाकीच्या भाषा हे त्यामध्ये जोडू शकतात मग फक्त मराठी भाषेलाच का डावलल जातय . “त्याच एक करण पण तस आहे,’amazon’ ने एक सर्वे केला होता कि त्यात त्यांनी अस पाहिलं होत कि, “जी दक्षिण भारतातील राज्य आहेत,तिथली लोकं ही त्यांची सर्व कामे ही त्यांच्या मातृ भाषेत करतात.”म्हणून त्यांना त्यांच्या भाषा त्यांच्या ॲप्लिकेशन मध्ये आणाव्या लागल्या. आज amazon च्या अँप्लिकेशन वर ज्या भाषा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत, जर त्या सगळ्या राज्यांची लोकसंख्या बघायला गेली तर ही १५ ते १६ कोटी च्या आसपास आहे,आणि आपल्या एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही १२ कोटीच्या वर आहे. तरीही ह्या लोकांना वाटत कि इथे हिंदीच चालते,तस नाहीतर हिंदी आपण चालवून घेतो हे त्यांना कळून चुकलय.मराठी नाही बोललं तरी ह्यांना काय फरक पडत नाही हे त्यांना कळून चुकलं आहे.नाही तर एवढ्या दिवस तर हिंदीतच चालू होत मग आता ह्यांना काय गरज पडली मराठीची? बरं…
मग आज त्यासाठी विरोध फक्त मुंबई मध्येच बघायला मिळतोय,म्हणजे बाकीच्या महाराष्ट्रातील मराठी लोकांना ह्या गोष्टी बद्दल काही वाटत नाही(वाटत असेल पण उघड नाही). म्हणजे जे काय होऊदे किंवा होतंय ते मुंबई मध्ये होतंय ना आम्हाला त्याच काय. मराठी फक्त मुंबई पुरती मर्यादित आहे का? महाराष्ट्रातला मराठी माणूस ह्या amazon ला एवढा व्यवसाय करून देतोय तरी पण असं.!! म्हणजे ह्यांना काय हरकत नाहीये जे amazon करतंय त्यावर.ह्यांना हिंदीचा त्रास नाही म्हणजे त्रास आहे तो फक्त मुंबईतल्या मराठीला आहे बरोबर ना.
आज कितीतरी कॉर्पोरेट कंपन्या ह्या मुद्दामून मराठी ला डावलण्याचा आणि हिंदी ला मराठी वर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे सगळे मेन ऑफिसेस हे महाराष्ट्रात, पण ह्यांना मराठी नकोय.आज मुदामून ग्राहक सेवा देणाऱ्या लोकांना मराठी बोलू नका म्हणून सरळ सांगितलं जातंय. मग ह्याला काय म्हणणार हे मराठीचा द्वेषच करत आहेत,मग ह्यावर सरकार आणि कोणी राजकर्ते काहीच बोलत नाहीत. त्यांना माहित आहे मराठी हा फक्त राजकारणाचा विषय आहे निवडणूक आली कि नुसता मुद्दा उचलून धरायचा बाकी मराठी जनता ही मूर्खच आहे. आता बोंबलतील आणि नंतर विसरून जातील.”त्यांना माहित आहे मराठी लोकांना काय मराठीचा मुद्दा उचलून धरला कि बस्स,एवढ केल कि बास”,बाकी कशाची गरज नाहीय त्यांना गंडवायाची.
मराठी माणसाने आपला स्वाभिमान कुठे गहाण ठेवलाय काय माहित? अरे एवढी गोष्ट का समजत नाही मराठी माणसाला आज जर मुंबईची अशी अवस्था होऊ शकते तर ती वेळ लांब नाहीय की महाराष्ट्रात ही अवस्था कुठेही होऊन बसेल आणि त्यावेळी पुन्हा मग तीच लाचारी घेऊन जगावं लागेल आणि मराठी माणूस पुन्हा ४०० वर्ष मागे फेकला गेलेला असेल.
काही लोक समित्यां आणि चळवळीन मार्फत काम करतायत पण तेवढ पुरेस नाहीय. आज नुसता दुकानावरच्या पाट्या बदलल्या म्हणजे त्यांना मराठी आलीच आणि त्यांनी मराठी बद्दल आदर दाखवलाच अस नाही ना. आज त्यांना ईथ व्यवसाय करायचा आहे,त्यामुळे ते त्यांना करणे भागच आहे.पण तो येणाऱ्या लोकांशी संभाषण तर हिंदीतच करणार ना तिथे तुमच्या पाट्या बदलण्याला काही अर्थ नाही उरत. हिंदीच भूत हे वेगाने पसरतंय आणि आपल्याच लोकांनी हे मनात धरून ठेवलय कि हिंदी ही राष्ट्र भाषा आहे म्हणून,मग तो बदल तो कसा घडणार?….
आज मुंबई पाठोपाठ आता पुणे , नागपूर ,नाशिक,नांदेड झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील शहरं घ्या सातारा, कराड ,कोल्हापूर,सांगली ह्या शहरांमध्ये हे हिंदीच प्रमाण वाढत चाललय. आपल्या लोकांनी काय केलं इंग्रजी भाषेला बगल म्हणून हिंदी निवडली आणि त्याचाच सपाटा लावला,आणि तेच सगळी कडे चालू झालं. आज मुंबई म्हणजे हिंदी हेच समीकरण झालंय.गावाकडन कोण येणार असेल तर तिथली लोक सांगतात तिथ हिंदी बोलायला लागतं हा आणि शिकून घे म्हणून आणि वरण सांगतात.आज मराठीची काय अवस्था आहे मुंबईमध्ये,आज नीट मराठी वाचता येत नाही आताच्या मुंबई मधल्या ह्या नव्या पिढीला,साधं मराठीत फोन नंबर सांगितलात तर बोलतात मराठीत कळत नाही इंग्लिश मध्ये सांगा.कशी मग मराठी संस्कृती अबाधित राहील तुम्हीच सांगा.त्याच कायच नाही वाटत इथल्या लोकांना. जे चाललय ते चालुदे.आज जसा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलाय तसचं एकदिवस मराठी पण मुंबईमधून बाहेर गेलेली असेल.
मुंबईतल्या लोकांनी त्यांच्या भाषा शिकून घेतल्यात,पण मराठी शिकवू शकले नाहीत किंबहुना त्याचा अट्टहास ही करू शकले नाहीत. आज मुंबईत कोणत्याही दुकनात जा किवा बाजारात जा,मराठी बोलला कि एकतर त्यांचा बोलण्याचा टोन बदलेला असतो नाहीतर ते सरळ तुम्हाला टाळून टाकतात.तुमच्या एकाच्या येण्यामुळे किंवा जाण्यामुळे त्याला काय फरक पडत नाही,पण त्याचवेळी आपल्या मनाला एक चटका लावून गेलेली असते ती गोष्ट. आज खरी गरज आहे ती महाराष्ट्राने जागी होण्याची आणि एकत्र येण्याची,आज आरक्षणासाठी तुम्ही एकत्र येऊ शकता मग आपल्या “मराठी“साठी का नाही येऊ शकत!,मातृ भाषेबद्दल एवढा निष्काळजी पणा का? त्याच महत्व काहीच नाही का आपल्या आयुष्यात आपल्या संस्कृतीत!
क्रमशः