
मराठी माणसासाठी मराठी हा मुद्दा असू शकत नाही,तो आपला अभिमान,ती आपली संस्कृती,तो आपला इतिहास आहे. मला तर खूप अभिमान आहे मी मराठी असल्याचा,या मातीत जन्माला आल्याचा. मग माझ्या भाषेचा मोठा शत्रू कोण आहे? ते दुसरं तिसरं कोण नसून आपणच आहोत.सगळं चालू झालं आपल्या पासूनच आणि ते संपवायचं पण आपल्या पासूनच चालू आहे. एवढा मोठा इतिहास आहे आपल्या भाषेचा आहे, तिचा काहीतरी आदर राखतो आहोत का आपण,तो आपण असा पुसत चाललोय त्याची कुणाला जाणीवच होत नाहीय.
आता थोडे लोक भाषे बद्दल जागे होतायत त्याबाबतीत काही दुमत नाहीय,पण त्यासाठी एवढा का वेळ लागावा? आजुन तरी थोडेच जागे झालेत पण बाकीच्यांना जाग यायला अजून किती वेळ लागणार आहे देव जाणो.झोपेचं सोंग घेतलेल्याला आपण किती ही जाग करायचं प्रयत्न केला तरी त्याला जाग येणार नाही.
मला आजून कळत नाही मराठीचा एवढा राग का ?आणि कशासाठी? आणि मुख्यत: करून मराठी माणसाला का तिरस्कार असावा मराठीचा.ठीक आहे इंग्रजी आल पाहिजे आणि शिकलं ही पाहिजे पण मराठीला डावलून आणि मराठी ला कमी लेखून नाही. इंग्रजी ही काळाची गरज असली तरी मराठी ही आपल्या संस्कृतीची आणि आपल्या इतिहासाची माहिती देणारी सोनेरी साक्ष आहे.आणि आज तीच साक्ष पुसण्याचा आपला अट्टाहास चालू आहे.
आज मुंबईत मराठी भाषिक हे फक्त हातावर मोजण्या इतके राहिलेत. मुंबईत प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने स्वतच्या भाषेचे ठिकाण बनवून ठेवलय. तिकडे गुजराती,इकडे मारवाडी ,तिकडे पंजाबी ,इकडे मुस्लीम ,इकडे तमिळ,तिकडे बिहारी. मग मराठी गेली कुठे ?मराठीचे मुंबईच्या बाहेर पण तेच तिथे पण वाभाडे निगतायेत,तिकडं काय दुसरं होणार जे मुंबईत चालू आहे तेच मुंबईच्या बाहेर पण चालू आहे.आपण मुंबईच्या बाहेर मराठी टिकवली जाते किंवा टिकली आहे, हे तरी कस म्हणू शकतो.
प्रत्येक राजकीय पक्ष आपपल्या पद्धतीने मराठीचा मुद्दा बनवून राजकीय फायदा करून घेतायत. कोणताच राजकीय पक्ष मराठीसाठी मनापासून काम करताना दिसत नाहीय. भले मग ती मनसे असो व शिवसेना. आज ह्यांच्या पक्षात आणि त्या त्या पक्षांच्या वार्ड मध्ये आता फक्त परभाषिक नेते पाहायला मिळतात . ज्यांना मराठीचा म सुद्धा माहित नाही ती आज महाराष्ट्रात येऊन नेतेगिरी करायला लागलेत.त्यात आपली लोकं पण त्यांच्या मागं मागं फिरत असतात,मग ह्याला राजकीय दृष्ट्या बिथरले ला कार्यकर्ता म्हणायचं, की स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली धडपड म्हणायचं
जर आता ह्या गोष्टींवर आपण लक्ष नाही घातलं तर, पुढच्या काही वर्षात हिंदी ही मुंबईची प्रथम भाषा म्हणून ओळखली जाईल आणि त्यावेळी सगळी हातातली संधी गेलेली असेलं .त्यावेळी मग परत शून्यातून सुरुवात करावी लागेलं. इथल्या शाळांमध्ये मराठी ही शिकावायची म्हणून शिकवली जाते. न त्या शिक्षकाला मराठी धड येत असत आणि मराठी शिकणारे पण हे सगळे परभाषिक म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणाव तसं. ह्यांना मराठी पण हिंदीत समजावून सांगाव लागत, ते फक्त परीक्षा पुरत मराठी म्हणून घेतात्त बाकी काही नाही. मराठी मुलांची पण जास्त काय वेगळी अवस्था नाहीय. दहावीच्या मुलाला पाचवीच पुस्तक वाचताना अस वाटत कि कोणत्यातरी लढाई वर गेल्यासारखं वाटत. दहावीच्या मुलाला पाचवीच पुस्तक वाचता येत नाही म्हणजे ,तुम्ही विचार करा काय आणि कस शिक्षण चालू असेल इथे.
नुसता दुकानावरच्या पाट्ट्या बदल्याने काही नाही होणार, ह्यासाठी असा कडक कायदा काढला पाहिजेत तर आणि तरच मराठी चा प्रसार होईल मराठी बद्दलची जी मानसिकता आहे ती बदलेल.आज किती जण मराठी बोलतात तुम्ही तरी सांगा?समजून चालुया की ४०-५० टक्के मराठी लोक मुंबईत आहेत अस गृहीत धरल,तरी त्यातले किती मराठी म्हणून वागतात आणि मराठीच वापर करतात.सरास मराठी माणूस च आता हिंदीचा वापर जास्त करायला लागलाय,हिंदी चांगली येते पण मराठी काय नीट येत नाही अस झालंय. मराठी आकडे सांगा,मराठी म्हणी विचारा,मराठी शब्द विचार एवढे गोधळलेले आहेत लोक ते फक्त मराठी मुळे काय!.काय करणार येतच नाही मराठी आणि तशी मराठी शाळेत शिकवली ही जात नाही.मराठी बोलताना ह्यांचे सगळे हिंदी शब्द त्यात हिंदी – मराठी गोधळ म्हणू शकता ह्याला😡.मग तीच प्रथा सगळी पडत चाललीय.मराठीसाठी महाराजांनी उगाच त्रास घेतला म्हणायचा,त्या परिस्थितीत आणि आताच्या होत चाललेल्या या परिस्तिथी मध्ये काय फरक आहे!…?
महाराजांनी मोठा संघर्ष करून हे स्वराज्य उभं केलं,मराठी च एक अस्तित्व निर्माण केलं आणि साऱ्या जगाला मराठीची आणि मराठ्यांची ताकत दाखवून दिली.पण आता परत त्याच अस्तित्वासाठी झगडावं लागतय ही किती शरमेची आणि दुःखद बाब आहे. जे अस्तित्व निर्माण करण्यासाठी एवढे बलिदान,एवढा त्याग केला ते सगळं विसरून गेलो आपण आणि साधं आपण आपल्या भाषेचं अस्तित्व ही टिकवू शकत नाही आहोत.जर हे असच चालू राहील तर एक दिवस ह्याचे परिणाम खूप वाईट बघायला मिळतील.
मराठी साठी आता ज्या समित्या काम करतायत किंवा करण्याचं विचार करतायत त्यांनी जिथे मराठी वापर आढळून येत नाही अश्या लोकांना एक एक सांगत बसण्या पेक्षा,एक परिपत्रक काढावं आणि त्यात सरकारचे जे नियम आहेत ते सांगावं आणि जर हे करून जर त्यानंतर असे सापडले तर मग सरळ कारवाई करायला चालू करावं.महाराष्ट्रात राहताय तर मराठी तर आलीच पाहिजे आणि मराठीचा वापर पण तेवढ्याच तत्परतेने झाला पाहिजे.मराठी येत नाही,मराठी का शिकू,नाही शिकणार ही असली कारण चालणार नाहीत हे ठणकावून सांगायचं आणि नाही ऐकलं तर सरळ लावून द्याची.मी तर तस दोघा – तिघांना लावलोय. येत नाहीत ते नाही, वरन आणि ह्यांच पावशेर ऐकून घ्याच व्हय.द्यायचं ठेवून सरळ साट साट कान फडात सुट्टी नॉट.
जो पर्यंत आपण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक एक मावळा आपल्या मराठी भाषेसाठी आग्रही असेल तेव्हाच मराठी वाचेल आणि वाढेल ही. बाहेरच्या देशातील लोक त्यांची भाषा वापरतात सगळ्या व्यवहारमध्ये. मग आपल्यालाच कसली लाज आहे. परदेशातल्या लोकांना मराठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल एवढा आदर आहे,ते लोक मराठी शिकतायत,चांगली मराठी बोलतायत.ते आपल्याला सल्ले देतायत कि तुमची संस्कृती तुमची भाषा जपा आणि तीच संवर्धन करा म्हणून मग विचार करा आपण कोणत्या संस्कृतीकडे चाललोय.यासाठी आता महाराष्ट्राच्या जनतेने खरंच जागे होण्याची वेळ आली आहे आणि व्हावंच लागेल आता.
आता संपूर्ण महाराष्ट्राने आणि मराठी जनतेने एक होऊन मराठी वाढवली पाहिजे.सगळ्यांना दाखवून देऊ मराठीची ताकत एके काळी मराठीने संपूर्ण भारत देशावर राज्य केलय.चला संकल्प करू मराठीचा माझ्या माय मराठीचा.
” जय महाराष्ट्र ” 🚩🚩🚩🚩 …….