
आता तुम्ही म्हणाल,ह्याला कुठून एवढा पुळका आला मराठी भाषेसाठी, तर पुळका वैगरे असं काही नाही एवढं दिवस कधी वाटलं नाही असं प्रेम वाटू लागलं माझ्या या भाषेबद्दल,आदर तर अजूनच वाढला आहे. गोष्ट अशी आहे तर, थोडं माझ्यापासून सुरुवात करतो. माझं संपूर्ण शिक्षण हे मराठीत झालेलं.इंग्रजी थोडंफार येत तसं जेमतेम च पकडा.त्यावेळी एवढं कधी वाटलं नव्हतं भाषेबद्दल,असं वाटायचं सगळं आपल्या भाषेतच चालतंय आणि हिंदी बिंदी ठीक हाय,ते आपलं हिंदी चित्रपट बघून वैगैरे तसं शाळेत विषय होताच म्हणा,मी पण तुमच्या सारखाच आहे,सगळं मध्यम वर्गीय कुटुंबातला, माझं कॉलेज पर्यन्तच शिक्षण हे गावीच झालं होत. हा आता कसं झालं एवढं विचारू नका, झालं कसं तरी एकदाच.
मग काय आता जॉब हुडकायाला कुठे जायचं हा प्रश्न ?आमच्याकडचे जास्त करून पुणे आणि मुंबई इथेच असायचे कामाला सगळे मित्र मंडळी. मग आम्हीपण निघालो, मी आधी आलो पुण्याला तिथे ४-५ महिने बघितले तिकडे काय झालं नाही म्हणून मग सरळ मुंबई गाठली,ज्याला सगळे माया नागरी मुंबई म्हणतो तिकडे आमचे प्रस्थान झाले. चला बघू म्हंटल इकडं तरी काय होतंय काय बघुया,इथे आल्यांनतर ४-५ महिने धडपडल्यानंतर मित्राच्या मदतीने एका ठिकाणी काम भेटलं. त्यावेळी जरा बरं वाटलं 😁 जस सगळ्यांना वाटत तसं.मुंबई ही कुणाला उपाशी नाही राहू देत नाही हे खरं.
जसे जसे दिवस जायला लागले तसं तसं थोडं समजायला लागलं, की मुंबईत राहायचं म्हंटल तर हिंदी यायला पाहिजे(हा माझा समज होता त्यावेळचा),त्यावेळी तस कारण पण तसंच होत, मी मित्रानं सोबत राहायचो त्यामुळे आमची मराठी ही फक्त खोली पूर्ती मर्यादित होती, बाहेर गेलं की हे तर दुसरं बिहार शहर. अजूनही तसंच आहे पण मी बदललोय,तरी स्वर्गीय बाळासाहेबांच्या प्रयत्नांनमुळे बॉम्बे च मुंबई झालं,अजून सुद्धा लोक बॉम्बे च म्हणतात,त्यात मराठी पण आहेत बोलणारे. जिथं जाईल तिथं नुसता हिंदी हिंदी हिंदी कान विटले माझे असं वाटायला लागलं की मराठी विसरतोय की काय.!
लहानपणी पाहलेली मा. बाळासाहेबांची भाषणं त्यांची आंदोलन हे मला नंतर समजायला लागलं. का ती आंदोलन व्हायची त्याची का गरज होती ते. त्यावेळी साहेबांची भाषण लागलं की आवडीने बघायचो, एक कुतूहल वाटायचं,ती गर्दी तो अफाट समुदाय.पण त्यातून मला अर्थ बोध कधी झाला नाही,का हे चाललंय,कशासाठी हा आटापिटा चाललाय.गावी राहायचो ना त्यामुळे एवढा कधी त्या गोष्टीचा प्रभाव नाही पडला,आपल चाललं होत निवांत.
मग हे सगळं समजायला तुम्हाला मुंबई ला यावं लागेल,खरंच हाय भाई.तुम्हाला सांगू काय खरंच,मुंबई ची बिहार, मद्रास बांगलादेश आणि अर्धा पाकिस्तान झालाय. मुंबईतला मराठी माणूस कुठं दिसतच नाही,तो कुठं हरवलाय काय माहित.कुणी त्याला गायब केलाय ,की स्वतः हरवून बसलाय देव जाणो.मला ज्या दिवसापासून समजायला लागलाय ना त्या दिवसापासुन मनात खूप संताप भरलाय ह्या गोष्टीसाठी. मनातल्या मनात खूप चीड चीड होते खूप,काय करू काय नको,कुणाकडे दाद मागायची ह्यासाठी कायच समजत नव्हत,असं वाटतय ना उठाव आणि सरळ एके एकेकाला, ठोकून बाहेर काढावा. पण लोकाधिकार मधी येतात,कुणी कुठेही कसाही जाऊन राहू शकतो😕.हे पण आपल्याला मराठी माणूसच सांगतो हा, ही खरी शोकांतिका आहे .
हे सगळं बरोबर आहे, राहा पण काय स्थानिक लोकांना त्या मातीतल्या लोकांना त्यांच्याच परीक्षेत्रातून बाहेर काढून राहणार काय? त्यांची संस्कृती त्यांचे हक्क काढून घेणार का? ह्यामध्ये आपला मराठी माणूस हळू हळू मुंबई बाहेर गेला आणि बाहेरची उपरे सगळी आत आली. काय झालय ओ त्या नवी मुंबई आणि ठाणे बाजूला,त्या शहरात पण तीच बोंब,असं वाटलं होत तिथं तरी मराठी माणूस असेल,त्याला पाहिजे त्या वातावरणात पण नाही,तिथं पण बिहार मॉडेल आणि नवीमुंबईत काय तेच होत आहे,आणि मराठी माणूस चाललाय अजून त्याचा ही बाहेर. हे मी फक्त एका शहरा पुरतं बोलत नाहीय. ह्याचा विळखा आपल्या मोठया शहरांमध्ये हळू हळू पडत चालाय हे लक्षात ठेवा.
क्रमश:……