
ज्या पद्धतीने मुंबईत मुंबईचे च आणि मराठीचे आणि त्यासोबत मराठी माणसाचे लचके तुटत आहेत,असं वाटतंय पुढच्या काही काळात तुम्हाला ऐकायला मिळेल कि कधी काळी मुंबईत मराठी बोलली जात होती, मुंबईत मराठी माणूस एकेकाळी राहत होता. मुंबई ही मराठी माणसाची होती. येणाऱ्या या परप्रांतीयांचे लोंढे आणि झालेल्या मुंबईचे हाल त्यामळे मराठी माणूस हळू हळू नाहीसा होत चाललाय मुंबई मधून. खरंच असं वाटतंय कुठं घेऊन चालोय आपला महाराष्ट्र,आपला इतिहास,आपली संस्कृती. इतिहास आणि संस्कृतीचं तर सोडूनच द्या ,त्याचा काय ह्या लोकांशी काहीही दूर दूर चा संबंध नाही. इथं हे मराठी भाषेला मानत नाहीत त्यांचा कडून कसली अपॆक्षा करायची इतिहास आणि संस्कृतीची.
मराठी ला एवढं लाचार व्हायला लागावं की स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्याच राज्यात धडपड करावी लागावी ,ही खूप गंभीर बाब आहे,आणि त्याच मुंबईतल्या मराठी माणसाला याच काय पडलेलं नाहीय . एक किस्सा सांगतो माझा, मी ज्यावेळी पहिल्यांदा मुंबईत आलो आणि पहिल्यांदा आपल्या लोकल ने प्रवास करत होतो त्यावेळचा प्रसंग आहे,मी कामावर जाण्यासाठी पहिल्यांदा लोकल पकडली,त्यावेळी माहित नव्हतं आणि एवढ्या गर्दीचा अंदाज ही नव्हता ,ती गर्दी पाहून मी खूप गांगरून गेलो होतो. हेच्या आईला आता कसं जायचं ह्यातून,मी विचार करतोय,आजूबाजूला लोक धकाबुकी करत धावताहेत. आजूबाजूची ती गर्दी बघून जरा पाच मिनिटे स्तब्धच झालो. आता माझा मित्र मला दिसेना,तो धावत डब्यात चढला लगेच, मला धाडस होईना,मग तो ओरडतोय चढ डब्यात लवकर गाढी सुटेल,मी आपला विचार करत उभा, काय करू काय करू,गाढी हळू हळू सुटायला लागली तस घाबरून मी सामान डब्यात धडपडत चढलो, त्यात कसा बसा चढलो,मग काय कसातरी उभारलो. अचानक एक कसलं तरी बोचक येऊन माझ्या पायावर येऊन पडलं आणि पाय सापडला त्या बोचक्या खाली.खूप जड बोचक होत हलता हलेना आणि मला नीट उभारता पण येईना,आणि ते बोचक होत एका मद्रासी बाईचं आणि तिन पाहिलं की मी तिच्या त्या बोचक्यावर हात ठेवून उभा आहे आणि तिचंच एक बोचक माज्या पायावर पडलंय,तरी पण ती शिव्या द्यायला चालू केली हिंदी मध्ये आणि त्याबरोबर आपले बांधव पण लगेच चालू झाले,मी सांगतोय त्यांना माझा पाय सापडलाय ह्या बोचक्या खाली मला उभारता येत नाहीय,तर त्या बाईनं काहीतरी लाकडा सारखं काहीतरी फेकून मारलं मला,आणि ते येऊन माज्या हाताला लागलं, आणि त्यात आपले लोक मला बोलायला चालू झाले, एकतर मारायला येत होता,त्याला गर्दीतून येता येतं नव्हतं म्हणून तो म्हणून तो तिथंच थांबला (मी त्याला काय असाच सोडणार होतो काय 😁) शेवटी माझा पण संयम सुटला मग काय , “मी एक तर कोल्हापूरचा मी एवढं सगळं ऐकून घेऊन गप्प बसणार्यातला तर नव्हतो मग चालू केल्या मी पण शिव्या कोल्हापुरी,मग काय निस्ता शिव्यांचा दंगा.” म्हणजे त्या पर राज्यातल्या बाईसाठी हे लोक आपल्याच मराठी माणसाला शिव्या घालतायत.
इथं कस हाय आपल्या माणसाला मदत नाही करणार पण दुसऱ्याच धोतर पकडायला मात्र जाणार.इथं सांगण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही बाहेरून मुंबईत आला तर इथला मराठी माणूस असा वागवतो की तेच लई शहाणे आहेत आणि गावाकडून येणारा गावठी आहे . तुमचे आई -वडील गावाकडूनच मुंबईत आलेत त्यामुळे तुम्हाला मुंबईची हवा लागली एवढच काय तो फरक . मुंबईत ना एक मात्र बघितलंय आपलाच मराठी माणूस आपल्याच मराठी माणसाची मारतो, नाही तर मारायला टपलेला असतो.तुम्हाला माझं बोलणं जरा चुकीचं वाटेल पण नाही जे आहे ते खरं सांगतोय. कुठं पण कुठल्या मराठी माणसावर अन्याय होउदे त्याचा मदतीला नाही जाणार तिथून पळ कसा काढायचा,आपण कशाला मधी पडून अडकून बसा,असं करून त्यातून काढता पाय घ्यायचा,मग अश्यावेळी त्याच्या मदतीला मग ते भैये लोकच येतात,हे पाहिलंय मी सगळं.
मुंबईत मराठी माणसाची ऐकी नाही म्हणून तर बाहेरचे उरावर येऊन बसलेत.मग बोंबलत बसायचं बाहेरचे लोक असे करतात आणि तस करतात. अरे इथं मराठी माणूस मराठी माणसा सोबत नीट मराठी बोलत नाही तुम्ही कसल्या ऐकी ची अपेक्षा करताय ह्यांच्याकडून ,ह्यांना मराठीत बोलणं एवढं क्लास वाटत नाही म्हणे.हिंदीत बोलेल क्लास असत म्हणे.हे असलं ह्यांचे विचार,मग बोंबलायचं काय मग त्या मराठीने. बाहेरच्या लोकांना माहिती आहे हे कधी एकत्र नाही येणार,एकमेकांचे पाय खेचण्यातून वेळ भेट्लातर हे कायतरी करणार ना.मी काय सगळ्यांनाच ह्यामध्ये मोडतोय अश्यातला भाग नाहीय पण ९९% ह्यामध्ये मोडतात.बाकीचे १% अशे लोक आहेत जे आपल्या मराठी आणि मराठी माणसासाठी खरो खरीच काम करतात.
मुंबईत बांधकामात जास्त करून हे बिहारी आणि बांगलादेशी लोक आहेत. त्यामध्ये हातावर मोजता येण्या इतके ते कामगार आणि सुपरवाईजर आहेत. पर्वा एक मराठी कामगार त्याच इथे काही कामगार ना घेऊन जाणार होता,(हे मी लांबून उभारून ऐकत होतो ह्यांचं भांडण) तर तो बिहारी कॉन्ट्रॅक्टर त्याला बोलला ‘तेरे आदमी नही लेके जानेका का इधर’ इधर मेरे आदमी जायेंगे तर त्याचा वरून त्यांचं चालू झालं.मराठी माणूस त्यात मराठीत बोलला तर त्यो माणूस त्याला म्हणतो हिंदी मे बात करनेका बम्बई मे. हे ऐकून अशी सटकली ना सरळ त्याला दोन शिव्या घातल्या(काय शिव्ह्या घातल्या त्या नाहींसांगू शकत ) त्याला म्हंटल मुंबईत मराठीत च बोलायचं हिंदी बिंदी हे तुज्या बिहार मध्ये जाऊन बोलायचं. मराठी माणसाला पण बोललो तुम्ही कसलं ऐकून घेताय ह्याच, बोलता येतं नाही काय तुम्हाला म्हंटल. काय नाही आपला माणूस गप्पच च. काय बोलणार असल्या लोकांना. थोड्या वेळाने परत तो त्याच्या सोबत कामाला निघून गेला, म्हणजे आपण भांडलो बोमब्लो त्याच काय नाही. पण नंतर समजलं आपला माणूस त्याच्या हाताखाली काम करतोय मग काय बोलणार. वाईट पण वाटत होत आणि राग पण येतं होता.
क्रमश:….