मुंबईतल्या वाढत्या अनधिकृत झोपडपट्टया! कधी थांबणार ?

मुंबईतल्या वाढत्या अनधिकृत झोपडपट्टया ! हा एक गंभीर प्रश्न आहे मुंबईचा,हा किती वर्षांपासून चालत आलेला प्रश्न आहे. का म्हणून आणि किती दिवस हे मराठी माणसाने असं सहन करत बसायच आहे.आज ही बाहेरची माणसं मुंबईत येऊन अनधिकृत झोपड्या बांधून राहतात,कामधंदा करतात.त्यांच्या राहण्यावर ,त्याच्या कामधंदा करण्यावर कोणतही सरकार आल तरी त्यांना काही आक्षेप का नाहीय? पण हेच उपरे नंतर त्याच मातीतल्या मराठी माणसाला,तिथल्या भाषेला,तिथल्या संस्कृतीला नाकारतो त्याला माझा आक्षेप आहे. हे येतात रातो रात झोपड्या बांधतात,ह्यांना काम पण मिळतं,ह्या गोष्टीकडे कुणाचं लक्षच नाहीये. बाहेरून कुठून आणि किती लोक येतायेत ना त्याला कोण विचारतय ना कुठली चौकशी होते न कुठला पाठ पुरावा केला जातो.

बरोबर आहे ना,आज हे लोक इथ ह्यांच सगळं कुटुंब घेऊन इथ रहतायेत,झोपड्याच्या झोपड्या उभ्या करतायेत. झोपड्यां मध्ये राहून नंतर ही तितल्या जागेवर हक्क सांगायला लागतात, मतांच्या भिकेसाठी त्यांना तिथले आमदार,खासदार,नगरसेवक ही सगळी मंडळी त्यांना मदत करतात, सरकार नाहीतर महानगर पालिका बिल्डर लॉबीच्या कक्षेत आणून त्यांना  त्यांची  स्वतःची घर देतायेत.अस ह्यांच बघायला गेल तर लई भारी चाललय.तसा मुंबईतला आपला मराठी माणूस खूप दुर्दैवी आहे ,कुठं झोपडी बांधून राहायचं म्हंटल तर हीच बाहेरची लोक त्यांना झोपडी बांधून राहू पण  देत नाहीत.म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसाला महाराष्ट्रातच उपरेपणा सहन करावा लागतोय ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे . महाराष्ट्रातून ज्या भागात पाणी टंचाई आहे,शेती पीकत नाही ,असे बरेचसे लोक उपजीवकेसाठी मुंबईत येतात. त्यापैकीच मी फुटपाथ वर असलेल्या लोकांना विचारलं का हो तुम्ही पण रहा ना झोपड्या बांधून ह्यांच्या सारखं,पावसा पाण्याचं बर नाही इथ,लहान पोर आहेत,कस रहातील ही.त्यावेळी ते म्हणाले,आम्ही आधी राहिलो होतो पण ह्या लोकांनी आणि तिथल्या भाई लोकांनी तिथून हाकलून लावलं. त्यापेक्षा हयो  फुटपाथ बर अस त्यावेळी ते बोलले.खूप वाईट वाटलं,त्यांच्यासाठी काही करू शकत नाही ह्यासाठी तर वाईट वाटलच पण वाईट जास्त वाटलं ते आपल्याच मराठी माणसाचे हे हाल त्याच्याच राज्यात होतायत हे बघून जास्त वाईट वाटलं.

आज आपला मराठी माणूस मुंबईत दिसतच नाहीये.तो कधीच मुंबईच्या बाहेर निघून गेलाय,मुंबईची हद्द वाढवली म्हणजे ती मुंबईचं आहे अस म्हणण हे चुकीचं आहे.आज ते उपरे मुंबईत येऊन रहातायेत त्यांनी बर सगळ्या परिस्थिशी जुळवून घेऊन राहिले.मग मराठी माणसाला कोणता त्रास होत होता.ही परिस्थिती काय वेगळी होती की त्यांच्या परिचयाची नव्हती!.

आज हीच बाहेरची आलेली माणसं झोपड्या बांधून नंतर बिल्डर लॉबी ह्यांना सरकारतर्फे बिल्डिंग मध्ये घरे नियोजित करून दिली जातात,ती पण एकेक नाही ह्यांच्या एके एकेकाच्या नावावर ३-४ घर आहेत.एवढी घर एकेकाच्या नावावर करताना सरकार परवानगी तरी कशी देत तेच समजत नाही.घर भाड्यावर टाकून पुन्हा ही झोपड्या बांधून राहायला तयार.परत कुठतरी झोपड पट्टी तयार करून परत स्वतच्या नावावर ३-४ घर करायला ही मोकळी झालेली असतात.पण हेच जर मराठी माणसाने केलं असत तर आता पर्यंत त्याच्यावर कारवाही होवून सगळं जप्त केलं असत नाही तर केस चालू असती त्याच्यावर.बरोबर आहे की नाही ,एवढी हिम्मत येते कुठून असल्या लोकांमध्ये आणि कुणामुळे येते एवढी हिम्मत?

मग अस मराठी माणसानं केलतर ते चुकीचं आणि बाहेरच्यांना मात्र त्यात सूट. हा कुठला न्याय.आज मराठी मराठी म्हणत मराठी माणूसच मराठी माणसाची सरळ सरळ मारतोय.आपल्या लोकांचं कस हाय आपल्या समरोच्याच चांगलं झालेलं आपल्याला जरा पण बघवत नाही अशी आपल्या लोकांची मनोवृत्ती आहे(सगळ्यांना ह्यात मोडतोय अश्यातला भाग नाही पण काही लोकं आहेत बरी नाही अस नाही).त्यानं एक ज्यादा झोपड बांधलं तर ते कस पाडायचं नाहीतर ते त्याच्या कस नावावर होऊ द्याच नाही ह्यात आपल्या लोकांना लयि रस.आहो तुम्ही हळू हळू तुमचीच माणसं गमावत चाललाय हे तुमच्या लक्षात येत नाहीय.

बर ह्यांना येवढं सगळं करण्याचं बळ येत कुठून? ह्यांची झोपडी बांधली जातात,ती त्यांच्या नावावर पण होतात ती पण एक एक नाही ४-५ घर असतात ह्यांच्या नावावर. हे सगळं करून कोण देत ह्यांना. साधं आपल्या मराठी माणसाने कुठे झोपाड बांधलं असेल तर ते अवैध ठरवून “बीएमसी”(BMC) वाले येऊन पाडून पण जातात.आणि त्याच जागी थोड्या दिवसांनी भैया नाहीतर मग ते मद्रासी आपलं झोपाड उभं करतात आणि नावावर सुधा करून घेतात,आता ह्यांना ही जी लोकं जे काय करतायत ते का नाही दिसत ह्या लोकांना.म्हणजे सगळा बडगा काय तो मराठी माणूसच सहन करणार आणि ही लोकं सगळी आमच्या उरावर आणून बसवणार.मग त्यावेळी तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी कडे जा कोण काय करणार नाही पण मत मागताना मात्र ह्यांना बरोबर मराठी माणूस आठवतो.नुसता सत्तेसाठी हपापलेले हे राज्यकर्ते आहेत.

हे सगळं करून देणारा पण मराठी माणूसच आहे जो की त्या प्रशासनात बसलेला आहे. त्याला आपल्या मराठी माणसाचं काम असेल तर मग १०० चक्रा मारून सुद्धा काम होत नाही.पण १५ दिवसापूर्वी आलेल्या परप्रांतीयांचा आधार कार्ड,पॅन कार्ड ५-६ दिवसात त्याच्या हातात,त्याला राहायला छप्पर,धंद्यासाठी जागा,सगळ सेटिंग सेट झालेलं असतं.ह्यांना विचारणारा कोण नाही.सगळं कायदे लागू ते फक्त मराठी माणसालाच,का? कारण तो वर कमाई देत नाही म्हणून.म्हणजे तुम्ही तुमच्या वर कमाईसाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्राची वाट लावणार. होय आमचाच महाराष्ट्र कारण तो तुमचा तो कधी तो नव्हताच.तुम्ही तो कधीच विकलात स्वतच्या स्वाभिमान सकट,जर तुम्ही काही चिरीमिरी साठी महाराष्ट्राची अशी वाट लावणार असाल तर काही गरज नाही असल्या लोकांची ह्या महाराष्ट्राला.

सगळं दिसत पण लोकांच्या तोंडातून ब्र पण नाही निघत,आणि कोणी विषय काढलाच तर तो चहाच्या टपरी पुरता मर्यादित असतो.तिथून विषय कधी पुढं जातच नाही,जाऊदे मरुदे कोण ती लफडी सोडवत बसणार,आपलं चाललंय ना बास्स.मग काय होणार ह्या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं आणि मुख्यत: माझ्या मराठीच.

क्रमशः….

Leave a Comment

error: Content is protected !!
Copy link